द.ग.तटकरे विद्यालय कोलाड १०वि चा निकाल
१००% कस्तुरी लोखंडे विद्यालयात प्रथम
कोलाड-कल्पेश पवार
मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून या मध्ये कोलाड द.ग. तटकरे विद्यालयाचा निकाल १००% इतका लागला असून कु.कस्तुरी तुषार लोखंडे. (९४.८०%) हिला गुण मिळाले असून ती विद्यालयात प्रथम आली आहे.
प्रथम क्रमांक. कु. कस्तुरी तुषार लोखंडे. (९४.८०%) द्वितीय क्रमांक कु. ओम अशोक सानप (९१.८०%) तृतीय क्रमांक कु. वैष्णवी विठोबा कदम (९१%) चतुर्थ क्रमांक कु. वेदांत विठोबा बारस्कर
(९०.६०%) पाचवा क्रमांक कु. अदिती चंद्रकांत धामणसे.. (९०.४०%)
मुख्याध्यापक तिरमले सर.पर्यवेक्षक, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.