तटकरे तंत्रनिकेतन कोलाड येथे डिप्लोमा प्रवेश सुविधा केंद्र सुरू…

तटकरे तंत्रनिकेतन कोलाड येथे डिप्लोमा प्रवेश सुविधा केंद्र सुरू ….
कोलाड ( कल्पेश पवार ) 
              नुकताच दहावी ,बारावी चा निकाल जाहीर झाला असून,विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण प्रवेश घेणे सोपे व्हावे, या साठी राज्याच्या तंत्रशिक्षण विभागा मार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.विभागाच्या परी पत्रकानुसार श्रीमती गीता द.तटकरे तंत्रनिकेतन कोलाड येथे शासकीय प्रवेश सुविधा केंद्र उपलब्ध आहे.
रायगड सह राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी व आवश्यक
कागदपत्रे व दाखले मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थेतर्फे श्रीमती गीता द.तटकरे तंत्रनिकेतन गोवे कोलाड या ठिकाणी प्रवेश साहाय्य केंद्रे सुरू केली आहेत. या सर्व केंद्रांवर विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व ऑनलाईन प्रवेश साहाय्य उपलब्ध असून इच्छुक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य विपुल मसाल यांनी केले आहे. अधिक माहिती साठी संपर्क ८३७८८९७२२२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *