प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी  अजय अविनाश कापसे यांची बिनविरोध निवड…

प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री अजय अविनाश कापसे यांची बिनविरोध निवड…कोलाड-कल्पेश पवार
रोहा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या चेअरमन पदाची निवड निवडणूक अध्यासी अधिकारी मा. एस एल कावले, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक निबंधक कार्यालय, रोहा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. चेअरमन पदाच्या निवडी करता केवळ एकमेव अर्ज आल्यामुळे श्री अजय अविनाश कापसे यांची पुढील कार्यकाळासाठी बिनविरोध चेअरमन म्हणून निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
शिक्षण,संघटन,कला, क्रीडा, सामाजिक,सांस्कृतिक याचबरोबर सहकार क्षेत्रात सुद्धा श्री अजय कापसे यांनी सलग तीन वेळा बिनविरोध संचालक म्हणून निवडून येऊन दुसऱ्यांदा बिनविरोध चेअरमन पदी त्यांची निवड झालेली आहे.
रायगड जिल्हा परिषदेत शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द उज्वल ठरली आहे. विद्यार्थी,शिक्षक व शैक्षणिक समस्या करता संघटन चळवळीच्या माध्यमातून आदर्श शिक्षक समिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष व रायगड जिल्हा मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून सतत क्रियाशील राहिले आहेत.
रोहा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करून त्यांना व शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *