श्रीमती गीता द तटकरे उच्च माध्यमिक विद्यलयाचा 12वीचा निकाल तालुक्यात अव्वल

श्रीमती गीता द तटकरे उच्च माध्यमिक विद्यलयाचा 12वीचा निकाल तालुक्यात अव्वल
कोलाड(कल्पेश पवार)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सन फेब्रुवारी 2024 च्या एच एस सी चां निकाल नुकताच जाहीर झाला त्यामध्ये कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळ कोलाडचें श्रीमती गीता द तटकरे मध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरसगाव या विद्यालयाचा 12 वीचा निकाल विज्ञान व वाणिज्य विभाग 100% लागला असून कला शाखेचा निकाल 94.73% लागला आहे.
दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास यासाठी गेले 15 वर्ष संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळ कोलाडचे श्रीमती गीता द तटकरे मध्या. व उच्च माध्यमिक विद्यालय वरसगाव ता.रोहा हे विद्यालय कार्य करते आहे. चणेरा भालगाव, मेढा, तांबडी,विले, भले, सुतारवाडी, इंदापूर ,सुकेळी नागोठणे या विभागातून अनेक विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात.तालुक्यातील दुर्गम भागातील मुलांना चागलं शिक्षण मिळावं या हेतूने मा. अनीलभाऊ तटकरे यांनी या विद्यालयाची उभारणी केली .आज विद्यालयाच्या उत्तम निकालाची परंपरा जपत 100% यश प्राप्त केल्याबाबत तालुक्यातून विद्यार्थ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .
विज्ञान शाखेत कु अपेक्षा संतोष वांगणे हिने 77.50%मिळवून प्रथम तर कू वांजळे ऋषिकेश व कु हर्षा बामुगडे यांनी द्वितीय आणि चिन्मयी मेहता व पारस ढोकरे यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. वाणिज्य शाखेत पाखर रसिका प्रथम ,राणे साक्षी द्वितीय तर खोपकर काजल तृतीय आली आहे. त्याच बरोबर कला शाखेत शिंदे दिपेश प्रथम,कांबळे शुभांगी द्वितीय तर म्हात्रे माणिक याने तृतीय क्रमांकात विद्यालयात येण्याचा मान पटकावला.
संस्थेचे विश्वस्त अध्याक्ष मां संदीप तटकरे यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सचिव श्री प्रकाश सर्कले यांनी ही शिक्षक व विद्यार्थ्याचे कौतुक केले.संस्थेच्या सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी ही विद्यार्थांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *