श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरसगाव या विद्यालयाचा १००% निकाल

श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरसगाव या विद्यालयाचा १००% निकाल निकालाची परंपरा कायम

कोलाड-कल्पेश पवार
कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळ कोलाडचे तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरसगांव ता.रोहा या विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचा निकाल १००% लागला १००% निकालाची परंपरा कायम राखल्यामुळे विद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. श्रीमती गीता द.तटकरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत मोफत व दर्जेदार शिक्षण देणारी ग्रामीण भागातील एक दर्जेदार शिक्षण संस्था आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम येथील शिक्षक करीत आले आहेत. उपयोजनात्मक शिक्षणावर भर देणे. वैयक्तिक विकास व कौशल्य शिक्षण याद्वारे विद्यार्थी घडवण्याचे काम या विद्यालयात केले जाते. सर्व शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी सदैव विद्यालय प्रयत्नशील असते. त्याचा परिणाम सन-२०२४ रोजी लागलेला माध्यमिक शिक्षण मंडळांच्या परीक्षेचा निकाल . ज्यात कु. जाधव रोहित संतोष प्रथम क्रमांकु कु. पवार तेजस प्रभाकर द्वितीय क्रमांक पोगंडे प्रतिभा संजय तृतीय क्रमांक असे विद्यार्थ्यांनी अनुक्रमे यश संपादन केले.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. संदीपजी तटकरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव मा.श्री. प्रकाश सर्कले यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *