आंबिवली येथे शिक्षण परिषद संपन्न
कोलाड,दि.५(कल्पेश पवार)

आंबिवली येथे शिक्षण परिषद संपन्न
कोलाड,दि.५(कल्पेश पवार)
रोहा तालुका येरळ केंद्राची रा.जि.प.शाळा आंबिवली आदीवासीवाडी येथे शिक्षण परिषद घेण्यात आली.
बदलत्या काळानुसार व शिक्षण क्षेत्रात होणाऱे आमुलाग्र बदल व परिवर्तन यादृष्टीने शिक्षकवर्गानेही नाविण्याचा ध्यास घेऊन आपल्यातील कौशल्ये अधिक विकसित करावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मासिक परिषदेमध्ये केंद्राचे केंद्रप्रमुख कुंदन जाधव यांनी शिक्षण परिषदेचे प्रस्ताविक केले.त्यानंतर शाळा सिद्धीचे मार्गदर्शन बादल जाधव यांनी केले. तर इंग्रजी संवाद कौशल्य अंतर्गत विद्या बुधवंत यांनी मार्गदर्शन केले.तर शिष्यवृत्ती परिक्षा सराव व मार्गदर्शन याबाबत विजय भोसले यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत जगताप व ग्रामस्थ दत्ताराम मुंडे मुख्याध्यापक प्रशांत वाघचौरे, उपशिक्षिका रेश्मा वाघचौरे व केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे स्वागत करण्यात आले.अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या शिक्षण परिषदेसाठी उपस्थितीत राहिलेल्या सर्वांचे आभार शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *