अखेर देवकान्हे ते खांब रस्त्याचे बांधकामास प्रारंभ
खांब,दि.८(नंदकुमार मरवडे)

अखेर देवकान्हे ते खांब रस्त्याचे बांधकामास प्रारंभ
खांब,दि.८(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील खांब ते पालदाड अंतर्गत मार्गाचे येणाऱ्या देवकान्हे ते खांब रस्त्याचे पक्क्या डांबरीकरण व खडीकरणाच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला आहे.
या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी खा‌.सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्याकडेही याबाबत विभागातील रहिवासीवर्गाने समस्या मांडल्यावर त्यांनीही या समस्येची दखल घेऊन व संबंधित शासन यंत्रणेजवळ वारंवार पाठपुरावा केल्याने त्यांच्याही पाठपुराव्याला याबाबत यश मिळाले आहे.
दैनंदिन प्रवासात या मार्गावरून प्रवास करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता
या रस्त्याचे पक्के डांबरीकरण व खडीकरण करणे ही काळाची गरज होती.अरूंद रस्ता त्यातच ठिकठिकाणी पडलेले खड्डे व खड्ड्यातूश वर आलेले दगडगोटे अपघातास कारणीभूत ठरत होते.त्यातच अरूंद रस्ता असल्याने वाहतुक कोंडीची समस्याही भेडसावताना दिसत होती.त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे ही मोठीच गरज असल्याने हा प्रश्न विभागातील रहिवासीवर्ग व दैनंदिन प्रवास करणारे पादचारी तसेच वाहनचालकांकडून
वेळोवेळी उपस्थित केला जाऊ लागल्याने या समस्येची अखेर संबंधित यंत्रणेने दखल घेतल्याने अखेर रस्त्याचे कामास प्रारंभ केल्याने सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *