भैरवीनाथ मालसई संघ ठरला कै.स्वप्नील चंद्रकांत कदम स्मृती चषकाचा मानकरी

भैरवीनाथ मालसई संघ ठरला कै.स्वप्नील चंद्रकांत कदम स्मृती चषकाचा मानकरी
खांब,दि.६(नंदकुमार मरवडे)
शिवमुद्रा मित्र मंडळ गावठाण आयोजित व शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन रोहा यांच्या
सहयोगाने गावठाण येथे संपन्न झालेल्या
भव्य विभागीय क्रिकेट स्पर्धेत कै. स्वप्नील चंद्रकांत कदम स्मृती चषक २०२४ चा मानकरी
भैरवीनाथ मालसई संघ ठरला आहे.
सरपंच निलेश जंगम,सदस्य शैलेश कदम, शेखर कदम, व विकास बामुगडे यांच्या हस्ते
उद्घाटन करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेसाठी पिंगळसई माजी सरपंच अनंत देशमुख साहेब,उद्योजग भरतराजे देशमुख, गौरव सुर्वे, महेंद्र पार्टे, रवींद्र देवरे, सागर फुलारे, महेश तुपकर, शेखर कदम, भरत सानप, मारुती कदम, निलेश मालुसरे, नथुराम मालुसरे, शंकर कदम, मारुती तुपकर, मंगेश ढमाळ, शैलेश कदम, निलेश जंगम, दिनेश राटाटे, धाऊ कोकळे जदंदगदीश कदम, गणेश सानप, गणेश कदम,अभिषेक सानप, योगेश कदम, अजय सानप,ऋषिकेश कदम आदींनी मोलाचे सहकार्य केले.
श्री.भैरवीनाथ मालसई या संघाने सुरूवातीपासून अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ केल्याने अंतिम सामन्यावर देखील मजबुत पक्कड मिळविल्याने जय भवानी गावठाण संघावर सहज मात करून चषकाचा मानकरी ठरण्याचा बहुमान पटकावल्याने गावठाण या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.तर स्पर्धेतील तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे मानकरी अनुक्रमे जाणता राजा पिंगलसई जय भवानी मूठवली खु.हे संघ ठरले.सामान्यातील मालिकावीर संघ म्हणून मालसई,उत्कृष्ट फळंदाज मनिष मुटके, गावठाण संघाचा ओमकार कदम, उत्कृष्ट गोलंदाज ऋषिकेश खंडागळे, व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विवेक मूटके यांना शैलेश कदम,निलेश जंगम,शेखर कदम, भावेश सानप, किरण कदम, दत्ता सानप आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.या सामान्यांचे समलोचन शरद कदम, व प्रकाश बामुगडे यांनी केले.तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिवमुद्रा मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांनी मोलाचं सहकार्य करून अपार मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *