कोलाड पोलीस स्टेशच्या निरीक्षक पदी नितीन मोहिते यांची नियुक्ती !

कोलाड पोलीस स्टेशच्या निरीक्षक पदी नितीन मोहिते यांची नियुक्ती !
कोलाड-कल्पेश पवार
मुंबई गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कोलाड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नितीन मोहिते साहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
              कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांची बदली झाली असल्याने या जागेवर नुकतेच पेण येथील पोलीस स्टेशन मधील नितिन मोहिते यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन मोहिते हे माणगाव,तद्नंतर पेण येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्याची आता कोलाड पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ( प्रभारी ) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.रविवारी दि.२८जानेवारी रोजी अजित साबळे यांचा निरोप समारंभ संपल्यावर नितिन मोहिते यांनी पदभार स्वीकारले.
           मोहीते यांच्या सोबत कोलाड येथील पत्रकार यांनी सुसंवाद साधला असता माझी संपूर्ण टीम सदैव येथील जनतेच्या सवरक्षना साठी तत्पर राहणार असल्याची प्रतिक्रिया,नवनिर्वाचित कोलाड सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन मोहीते यांनी पत्रकारांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *