
गोवे येथे नरेंद्र शेट जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त
जिल्हा स्तरीय बैलगाडी शर्यतीचा थरार!
अलिबाग प्रमाणे रोह्यात ही बैल गाडी शर्यती भरवल्या जातात याचा आंनद-आ.अनिकेत तटकरे
कोलाड दि.२६ (कल्पेश पवार)
ग्रामपंचायती चे माजी सरपंच नरेंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गोवे येथे मोफत भव्य जिल्हा स्तरीय बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.या शर्यतीत आ.अनिकेत तटकरे यांनी नरेंद्र जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत येथे सदिच्छा भेट दिली. व अलिबाग प्रमाणे रोह्यात ही बैल गाडी शर्यती भरवल्या जातात याचा आंनद व्यक्त केला.
यावेळी व आ.अनिकेत तटकरे,गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे,माजी सरपंच नरेंद्र जाधव, प्रकाश थिटे,युवक अध्यक्ष जयवंत मुंडे,आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे,गोवे उपसरपंच रंजिता जाधव,दशरथ सालवी,राकेश शिंदे,बालकृष्ण भोसले, ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव,नरेंद्र पवार,अंजली पिंपळकर,निशा जवके, भावना कापसे, ग्रामसेवक गोविंद शिद, गावकी अध्यक्ष नामदेव जाधव लहु पिंपळकर,राकेश कापसे,बळीराम जाधव,महेंद्र जाधव,नितीन वारकर, पांडुरंग जाधव विजय पवार,शांताराम पवार,मनोहर मांजरे,सुभाष वाफिलकर तसेच जय हनुमान मित्र मंडळ मधील सर्व सद्स्य युवक ग्रामस्थ,उपस्थित होत्या.
राष्ट्वादी कॉग्रेस पार्टी विभागीय अध्यक्ष तथा गोवे चे माजी सरपंच नरेंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गोवे येथे नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान मित्र मंडलाच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्राजक्तसत्ता दिनी माती बंदर गोवे येथे मोफत भव्य जिल्हा स्तरीय बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत जिल्हा भरातुन जवळपास 90 बैल गाडी जोड्या यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्ध्येत रोहा तालुक्यातील अस्टमी येथील गाडी मालक राज गोवर्धने यांची बैलगाडी अंतिम फेरीत प्रथम अली तर दुतीय अधिश कार्लेकर कुरुळ अलिबाग,तुतीय संतोष गायकर उदडवणे यांनी पटकावलं तर सेमी फायन मध्ये संदेश भोइर देवकाने
यांची बैल गाडी प्रथम व दुतीय दाबीत अस्टमी,तुतीय वेद गोगल माणगांव या गाड्या विजयी झाल्या या तर गटात व सर्व विजयी होणाऱ्या गाडी मालकाना आ. अनिकेत तटकरे तसेच प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या बैल गाड्या शर्यतींचा थरारचे उत्तम समालोचन नीलेश जाधव व अमित घरत यांनी केले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान युवक मंडळ व गोवे ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली