हेटवणे येथील क्रीडा स्पर्धेत भीम सेवा चिंचवली प्रथम !

हेटवणे येथील क्रीडा स्पर्धेत भीम सेवा चिंचवली प्रथम !
कोलाड-(कल्पेश पवार)
              रोहे तालुक्यातील कोलाड हेटवणे येथे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत भीम सेवा चिंचवली संघांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
                  को .वि .ना .अं .बॉ .क्रि .असोसिएशन च्या वतीने जय बजरंग क्रीडा मंडळ हेटवणे मार्फत शनिवार दि.27/01/2024 रोजी रात्रौ ८ वाजता क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.या वेळी प्रमुख हेटवणे गावचे दर्शन तेलंगे यांचे हस्ते सामन्याचे उदगाटन करण्यात आले यावेळी मडलाचे अध्यक्ष अनिल निकम, उपाध्यक्ष अमीर तेलंगे,कोलाड असोशीन चे अध्यक्ष राहुल शिंदे आणि हेटवणे गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .यावेळी उत्कृष्ट खेळ खेळीत प्रथम क्रमांक. भीमसेवा चिंचवळी दुतीय क्र. हेटवणे तुतीय क्र. रोहा रोड
चतुर्थ क्रमांक.प्रदीप सावत उत्कृष्ट फालदाज.. भीमसेवा चिंचवळी अमित उत्कृष्ट गोलंदाज. हेटवणे संघाचा विनोद पोटले सामनावीर. भीमसेवा चिंचवळी संघाचा पीयूष याना सन्मानित करण्यात आले.
                हे सामने चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी
जय बजरंग क्रीडा मंडळ हेटवणे संघाच्या सर्व सभासदांनी खूप मेहनत घेतली…

फोटो कॅप्शन-
हेटवणे येथील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर छाया कल्पेश पवार कोलाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *