खांब जवळ भीषण अपघात कार ची इर्टीगा गाडीला धडक ; ५ जण जखमी
कोलाड – कल्पेश पवार
मुंबई गोवा महा-मार्गावर बुधवार दि.२४ जाने.रोजी साडे चार च्या सुमारास खांब गावचे हदिदत
कार ची इर्टीगा गाडीला सामोरा समोर धडक लागुन अपघात झाला या धडकेत ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलाड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २४ जानेवारी रोजी साडे चार च्या सुमारास खांब गावाच्या हद्दीत
फिर्यादी नजीर फकीर, वय 39, रा. मु पो खेड ता. चिपळुन, चिपळुन, रत्नागिरी,हे त्यांचेकडील इर्टीगा कार क्र एम.एम.08 झेड 6769 ही वाशी नवी मंदुबइ येथुन मुंबइ गोवा हायवे रोडने चालवित घेवुन चिपळुन येथे जात असताना मौजे खांब गावाचे हददीत आलेवेंळी खांब गावाजवळ आलेवेळी दोन रस्ते विभागले असुन खबर देणार हे त्याची गाडी रस्त्याचे डाव्या बाजुने चालवित घेवुन जात असताना समोरून अचानक कार क्र एम.एच.02 सी.एच.6133 ही
वरील चालक महमद आयुब याकुब कुरेशी हा त्याचेकडील कार मुंबइ बाजुकडे अतिवेगाने चालवित घेवुल रस्त्याचे परिस्थीकडे दुर्लक्ष करून समोरून गाडीला ओव्हटेक करीत असताना खबर देणार यांचे गाडीसमोर आल्याने तिची ठोकर इर्टीका गाडीला लागुन अपघात होंवुन सदर अपघातामध्ये दोन्ही गाडीमधील इसमांना मार लागुन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.यात शरीफा अली पारकर, वय 85, रा. रा. कालुस्ते खुर्द चिपळुन रत्नागिरी आमीन कादीर बिजले, वय 72, रा.रा.कालुस्ते खुर्द चिपळुन रत्नागिरी अब्दुल रहमान अब्बास फीरफीरे, वय 73, रा. रा. धामणदेवी चिपळुन महमद आयुब याकुब केरेशी, वय 61, रा. रा. माहिम मुबइ अरुण भालचंद्र काळे, वय 69, रा. रा. बोरीवली वेस्ट मुंबई हे जखमी झाले आहेत.
याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गु.र.नं0005/2024, 279 337, मोटार वाहन अधिनियम, 1988 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सपोनि अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तसाप सुरू आहे.