पुगाव येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मुत्यु  !

पुगाव येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मुत्यु  !
कोलाड-कल्पेश पवार
                   रोहे तालुक्यातील पुगाव येथे गावानजीक असलेल्या कालव्यात महिला साडी धुण्यासाठी गेल्या असता त्यांचा पाण्यात बुडून मुत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
               याबाबत मिळालेल्या माहीती नुसार,
हिराबाई महादेव येलकर, वय: 75, रा.पुगाव कोलाड या बुधवार दि.२४जाने रोजी गावजवळील कालव्याच्या पाण्यात साडी धूण्यासाठी गेल्या असता
त्या सायपानारचे लॉखंडी जाळीला अडकलेल्या मयत अवस्थेत मिळुन आल्या आहेत.त्यांचा पाण्यात बुडून मुत्यु झाला असून
           या घटनेची नोंद कोलाड पोलीसात अकस्मात मूत्यू 002/2024 अशी करण्यात आली आहे.अजित साबळे यांच्या मार्गदर्शना खाली अधिक तपास गायकवाड करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *