श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त मालसई गावांत जलोष ! जय श्री राम घोषणांनी पंचक्रोशी दुमदुमली !
प्रतिनिधी- कल्पेश पवार
सोमवार दि.२२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली असल्याने या आनंदा निमित्ताने मालसई गावांत जलोष साजरा करण्यात आले.तर येथील गावा सह पंचक्रोशी श्री राम घोषणांनी दुमदुमली असून येथे भक्तिमय वातावरण होते.
मालसई गावांत झालेला हा कार्यक्रम तालुक्यात नंबर वन झाल्याची चर्चा पंचक्रोशीत होती.
अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली असल्याने देशभरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.या सोहळ्या निमित्ताने सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तर रोहे तालुक्यातील मालसई गावं व पंचक्रोशीत देखील
२२ जाने.रोजी श्रीरामाच्या प्रतिमेची मांडणी करून विधीवत पूजन करण्यात आले.तसेच ग्रामदैवतांचेही पूजन करून महाआरती व जप करण्यात आला.
सकाळीः ९.०० ते १९.०० गावातील शोभायात्रा (दिंडी)* सकाळी ११.०० ते १२:३० प्रत्येक गावात भजन (नामस्मरण)* दुपारी १२.३० वा. प्रत्येक गावात पुष्पवृष्टी नंतर आरती व महाप्रसाद दुपारी ३.०० वा. श्री राम मंदिर पिंगळसई येथुन शोभायात्रा प्रस्थान शोभायात्रेचा मार्ग-पिंगळसई-वांदोली-मढाली-सोनगाव-गावठण- धामणसई-मुठवली येथून मालसई गावांत शोभायात्रा काढण्यात आली.यात जय राम श्री राम जय जय राम जय जय राम नावाचा जप करण्यात आला व पंचक्रोशीतील आलेल्या या शोभा यात्रेत राम, सीता, लक्षुमन ,हनुमान जी यांची वेशभूषा करण्यात आली.
या कार्यक्रम निमित्ताने गावात दोन दिवस भक्तिमय वातावरण होते.संपूर्ण गावात,युवकांनी पताके, घराघरात,रांगोळी व श्री रामाचे झेंडे,तर सायंकाळी दिवे लावण्यात आले होते.या शोभायात्रेचे ग्रामस्थांनी पुष्पदृष्टी करीत स्वागत केले.तर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर मालसई येथे सायं. ५.३० ते ६.३० हरिपाठ सायं. ६.३० ते ८.३० किर्तन दिनेश महाराज कडवं यांनी आपल्या कीर्तन सेवेतून श्री राम मंदिर बदल माहिती दिली.रात्री ८.३० नंतर दिपप्रज्वलन,श्रीराम रक्षा खोत्र,आरती व महाप्रसाद करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गेली 8 दिवस ,मालसई मधील युवक,युवती महिला ग्रामस्थ मंडळ यांनी मेहनत घेतली.