शिरवली ते गोवे मुख्य रस्त्याचे भूमिपूजन थाटात

रायगडची जागा मीच लढवणार – खा सुनील तटकरे
गोवे येथे शिरवली ते गोवे मुख्य रस्त्याचे भूमिपूजन थाटात
कोलाड-खांब (नंदकुमार मरवडे/कल्पेश पवार)
                   उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी रायगडाच्या जागेची घोषणा केल्याने ही रायगड ची जागा मीच लढवणार असल्याचे खा.सुनील तटकरे यांनी
ठाम पणे सांगितले रोहा तालुक्यातील गोवे ग्रा.पंचायत हद्दीतील महामार्ग ते गोवे, मुठवली व शिरवली ते राष्ट्रीय महामार्गा पर्यंत रस्त्याचे रूंदीकरणाचे भूमिपूजनाचा सोहळा गोवे येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खा.सुनील तटकरे बोलत होते.
              यावेळी व्यासपीठावर विभागातील नेते,रामचंद्र चितळकर,प्रकाश थिटे,बाबुराव बामणे,नारायण धनवी, वसंत मरवडे, मनोज शिर्के,संजय मांडुळस्कर,सरपंच महेंद्र पोटफोडे,किरण मोरे,उपसरपंच रंजिता जाधव, नरेंद्र जाधव,तानाजी मोरे,बालकृष्ण भोसले,
रमण कापसे,लहु पिंपळकर,भाऊ कापसे, राकेश कापसे,संदीप जाधव,प्रवीण पवार,राजेंद्र जाधव,अनंता पवार, हरीचंद्र जाधव,शांताराम पवार,गावकी अध्यक्ष नामदेव जाधव,श्रीधर गुजर,राजेश शिर्के,सुभाष वाफिलकर,महाडिक सर,सुभाष पवार,ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पवार,सुप्रिया जाधव,नितीन जाधव,अंजली पिंपळकर,निशा जवके, भावना कापसे,ग्रामसेवक गोविंद शिद,मयुरी जाधव, तसेच गोवे, मुठवली,शिरवली ग्रामस्थ,युवक,महिला उपस्थित होत्या.
               महाराष्ट्र शासन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था रायगड अंतर्गत राममा १७ खांब ते शिरवली, मुठवली बु. गोवे ते रममा १७ रस्ता बांधकाम (लांबी ५.०० कि.मी.) ता.रोहा अंदाजित रक्कम रु.४०५.८४ लक्ष या कामाचा भुमी पुजन सोहळा मा.खा.श्री.सुनिलजी तटकरे (खासदार – रायगड लोकसभा मतदार संघ) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक ०२/१२/२०२३ रोजी दुपारी ०३.३० वा पार पडले.यावेळी मुठवली,ग्रामस्थांनी नदीकडे जाणारा रस्ता,तर गोवे नदी सवरक्षन भिंत ची मागणी केली.
सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार नंदकुमार मरवडे,नरेंद्र पवार यांनी केली.तर आभार पांडुरंग जाधव यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *