पतीने केला पत्नीचा कोयत्याने खून,आरोपी अटक कोलाड विभागातीळ पाले खुर्द येथील घटना

पतीने केला पत्नीचा कोयत्याने खून,आरोपी अटक
कोलाड विभागातीळ पाले खुर्द येथील घटना
कोलाड (कल्पेश पवार)
                  घर बांधण्या करीता घेतलेल्या कर्जाच्या वादा वरून नवऱ्याने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत खून केल्याची दुर्देवी घटना कोलाड येथील
पाले खुर्द हद्दीत घडली आहे.घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आरोपी पती ला अटक करण्यात आले आहे.
               या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार रविवारी दि.३ डिसेंबर रात्रीच्या सुमारास मौजे कोलाड पाले खुर्द येथील वैभव राम ठाकूर (३७) यांनी त्यांची पत्नी विद्या वैभय ठाकूर (३३) हिच्याशी घर कामाच्या बांधकामाच्या कर्जाचा वादातून त्याच्यावर कोयत्याचे वार करत तिच्या कानावर तसेच डोक्यावर जोरदार वार करून तिला जिवे ठार केले आहे.
               आरोपीत याने घर बांधण्यासाठी काढलेले कर्ज फेडण्यावरुन त्यांची पत्नी हिस सोबत वाद झाल्याने त्या रागाने आरोपीत याने लोखंडी कोयत्याने पत्नीचे उजव्या कानावर व त्याच ठिकाणी डोक्यामध्ये वार करुन ठार केले घर बांधण्यावरील कर्जाचा वाद अखेर पत्नीच्या जीवावर बेतलाचे समोर आले आहे तर मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
                 या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस  सपोनि अजित साबळे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीस ताब्यात घेहून अटक केली आहे.
कोलाड पोलीस स्टेशनमध्ये ११६/२०२३, भा. दं. वि. सं . कलम ३०२,५०४, ५०६ प्रमाणे नोंद झाली आहे तसेच कोलाड पोलिस सपोनि अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई साळुंखे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *