पत्रकार केशव म्हस्के यांना बंधूशोक
कोलाड,दि.६(कल्पेश पवार)
रोहा तालुक्यातील खारी-काजूवाडी येथील रहिवासी असणारे अनंत रघुनाथ म्हस्के यांचे शनि.दि.२ डिसें.रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ५२ व्या वर्षी पुणे राहत्या निवासस्थानी दु:खद निधन झाले.त्यांच्या दु:खद निधनाने समस्त म्हस्के परिवार व खारी-काजूवाडी गावासह परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे
सामाजिक बांधिलकी जपून समाजासाठी योगदान देऊन काम करणारे अनंत म्हस्के हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.सदा हसतमुख व प्रसन्न चेहरा तसेच प्रत्येकाच्या सुख-दु:खात हमखास सहभागी होणा-या अनंत म्हस्के यांनी आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने सा-यांची मनं जिंकून घेतली होती.त्यांच्या एकाकी दु:खद निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह त्यांचे आप्तस्वकीय मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,दोन भाऊ,तीन बहिणी असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी सोम.दि.११ डिसें.तर अंतिम धार्मिकविधी गुरू.दि.१४ डिसें.रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.