खा.सुनील तटकरे गोवे गावात
गोवे ते शिरवली मुख्य रस्त्याचे होणार भूमिपूजन
कोलाड-कल्पेश पवार
गोवे,मुठवली,शिरवली या तीन गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्या साठी तब्बल चार कोटि पाच लाख रु चा विकास निधी मंजूर झाला असून या
प्रमुख रस्त्याचे उद्घाटन खा.सुनील तटकरे आ.रविशेट पाटील यांच्या उपस्थितीत शनिवार दि.२ डिसेंबर रोजी साय.४ वाजता होणार आहे.या कार्यक्रमाची जय्यत तयारी सरपंच महेंद्र पोटफोडे,यांनी केली आहे.
गोवे,मुठवली,शिरवली,या तीन गावांना जोडणारा मुख्य रस्ता प्रधान मंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झाला असून,याकामी भरगोस निधी उपलब्ध झाला असून प्रमुख रस्त्याचे भूमिपूजन खा.सुनील तटकरे आ.रविशेट पाटील यांच्या उपस्थितीत शनिवार दि.२ डिसेंबर रोजी साय.४ वाजता होणार आहे.