बल्हे ,हंडेवाडी येथील पाणी योजनेचे काम चालू करा अन्यथा कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा
वेळ पडल्यास उपोषणालाही बसणार
रवींद्र तारु शेट यांचा निवेदनातुन प्रशासनाला थेट इशारा
कोलाड : कल्पेश पवार
रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचोली तर्फे आतोणे हद्दीतील बल्हे ,हंडेवाडी येथे जल जीवन मिशन योजने अंतर्गत काम गेल्या ११ महिन्यापासून ठप्प आहे.शासनाचे आदेश असूनही ठेकेदार काम चालू करीत नाही जाणून-बुजून या दिरंगाई केली जात आहे त्यामुळे रोहा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अशा ठेकेदारावर त्वरित कठोर कारवाई करून पाणी योजनेचे काम लवकरात लवकर चालू करावे अन्यथा रोहा ग्रामीण पाणीपुरवठा विभागासमोर हजारो महिलांचा हंडा मोर्चा काढू वेळप्रसंगी लोकांसाठी उपोषणाला बसू असा सण सनी इशारा भाजपा नेते रवींद्र काशिनाथ तारू शेठ यांनी मंगलवार दि. ( 21) रोजी निवेदनातून रोहा पाणीपुरवठा विभागाला दिला.
रायगड जिल्ह्यात अनेक जलजीवन मिशन योजनेची कामे चालू झालेले आहेत काही अंशता कामे पूर्णत्वा गेलेले आहेत. मात्र रोह्यातीळ बाल्हे व हांडेवाडी येथील गावाची पाणी पुरवठा योजना जाणून-बुजून का चालू करत नाही ? प्रशासन व ठेकेदार यांची मिली भगत तर नाही ना ? असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागला आहे . या योजनेला दिनांक 19 / 6/ 2022 रोजी तांत्रिक मान्यता मिळाली होती व या योजनेचा गजराज कंट्रक्शन या ठेकेदाराला 6 डिसेंबर 2022 रोजी टेंडर पास झाले होते मात्र या ठेकेदाराने गेले ११ महिने येथील लोकांना केवळ पाणी योजनेचे गाजर दाखवून फसवले आहे त्यामुळे रोहा पाणीपुरवठा विभागाने गावकऱ्यांची सहनशक्तीचा अंत न पाहता त्वरित ठेकेदाराकडून पाणी योजनेचे काम चालू करून देऊन नागरिकांना पाणी योजनेच्या माध्यमातून चालू करून द्यावे असे मागणी तारू शेठ यांनी केले आहे
बाल्हे व हंडेवाडी येथील गजराज कन्ट्रक्शन या ठेकेदाराने दिरंगाई केल्यामुळे जलजीवन मिशन योजनेचे काम थांबले आहे त्यामुळे अशा ठेकेदारावर कारवाई संदर्भात जिल्हा पातळीवर अहवाल सादर केलेला आहे : रोहा ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी जागृती माळी मँडम