मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नजीक भीषण अपघात २ जण ठार :एक जखमी

मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नजीक भीषण अपघात २ जण ठार :एक जखमी
कोलाड – कल्पेश पवार
                    मुंबई गोवा महा-मार्गावर मंगळवारी रात्री ११च्या सुमारास कोलाड हद्दीत कोकण रेल्वे पुला खाली   ट्रेलर चालकाने सलोरिवो कार ला धडक मारून भीषण
अपघात झाला हा अपघात एवढा गंभीर होत की या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे.
                याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलाड पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी हनुमंत मुंडे कोलाड पोलीस ठाणे वाहतूक शाखा यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मंगळवार दि.२एफिल रोजी रात्री ११च्या सुमारास
                  १)योगेश सुधाकर गुरव रा.वैभव नगर वरसे रोहा.२)परेश नामदेव खांडेकर रा.राम मंदिर मराठा अली अस्तमी रोहा ३)योगेश मनोहर पाटील वरसे रोहा हे तिघे जण आपल्या ताब्यातील  सेलोरियो कार क्र एम एच ४७/डब्लू १७६५ ही खांब बाजू कडुन रोहा येथे जाण्यासाठी मुंबई गोवा हायवे रोडने येवुन कोलाड येथील कोकण रेल्वे पुलाखालून उजवे बाजुला द ग तटकरे हायस्कूल रोडने जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना गोवा बाजुकडुन भरधाव वेगात वाहन आलेला ट्रेलर क्र एम एच ४३ बीएक्स ९५१९  चालक शेरसिंग ओम प्रकाश यादव उतर प्रदेश यांनी याने रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व बेदरकारपणे ट्रेलर चालवून सेलेरियो कार क्र एम एच ४७ डब्लु १७६५ ही रस्ता ओलांडत असताना तिस ठोकर मारून अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये योगेश सुधाकर गुरव व परेश नामदेव खांडेकर याचे मुत्यु झाला तर योगेश पाटील जखमी झाला असून त्याला पुढील उपचार करण्यासाठी दवाखान्यात नेले आहे.
            याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गु.र नंबर ३०/२०२४ भादवि कलम ३०४ (अ), २७९,३३७,३३८ मो या का कलम १८४ प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनास्थळी  शैलेश काळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा विभाग ,कोलाड सपोनि नितीन मोहिते,यांनी भेट दिली तर यांच्या मार्गदर्शनाखाली  अधिक तपास एन एल चौधरी,एन व्हाय गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *