आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी इच्छूकांनी अर्ज सादर करावेत -उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते

MH06CN दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु
आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी इच्छूकांनी अर्ज सादर करावेत -उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते
              रायगड दि.3(जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे MH06CN दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरुन हवे असतील त्यांनी दि.05 एप्रिल 2024 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या परिवहन विभागात डीडी, पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते यांनी केले आहे.
            तसेच एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.05 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.08 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये घालून कार्यालयात जमा करावा. अतिरीक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रु. चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षिणचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जासाठी त्याच दिवशी सायं. 4.00 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.
              ज्या दुचाकी वाहनांना चारचाकी वाहनाच्या नोंदणी क्रमांकासाठी  आलेल्या अर्जाचे नोंदणी क्रमांक वगळून आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरुन हवे असतील त्यांनी दि.08 एप्रिल 2024 रोजी  कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या परिवहन विभागात जमा करावेत.
              यामध्ये एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.10 एप्रिल 2024 रोजी रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.10 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तोच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये घालून कार्यालयात जमा करावा. अतिरिक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रु.चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षण चा विचार केला जाणार नाही. सदर अर्जासाठी त्याच दिवशी सायं. 4.00 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.
                 डीडी Dy. RTO, PEN यांच्या नांवे नॅशनलाईज्ड/शेड्युल्ड बँकेचा असावा तसेच तो दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. अर्जादाराने अर्जासोबत पॅनकार्ड व आधारकार्ड साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी (फक्त एकच डीडी) या सीलबंद पाकीटात जमा करावा. आकर्षक क्रमांकासाठी आलेल्या अर्जासोबत असणारे धनाकर्षण अर्ज स्विकारणाऱ्या    दिवासापासून दोन महिन्यापेक्षा जुने असलेले धनाकर्षणाचे अर्ज बाद केले जातील. तसेच विहित शुल्कापेक्षा कमी रक्कमेचे असलेले डीडी सुद्धा बाद केले जातील.
          एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रह होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.
आकर्षक क्रमांकासाठी आगाऊ स्वरुपात अर्ज स्विकारत असून चालू मालिका संपल्याशिवाय नवीन मालिका सुरु होणार नाही. तसेच आगाऊ प्रक्रियेमध्ये स्विकारलेल्या अर्जाच्या धनाकर्षणच्या पावत्या, जुन्या मालिकेतील पूर्ण नंबर संपल्याशिवाय फाडल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *