कोलाड आंबेवाडी येथील तरुण जयेश परबलकरचा पुई कालव्यात आढळला मुत्यु देह !

कोलाड आंबेवाडी येथील तरुण जयेश परबलकरचा
पुई कालव्यात आढळला मुत्यु देह !
कोलाड दि.२ एफिल ( कल्पेश पवार )
                   संभे येथे क्रिकेट बघण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या आंबेवाडी येथील ३१ वर्षीय जयेश परबलकरचा मृत्यू देह १ एफिल रोजी सकाळ च्या सुमारास पुई कालव्यात आढळून आला.या घटनेने सर्वत्र हळहल व्यक्त करण्यात येत असून  घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.
                  या विषयी अधिक माहिती अशी की,
जयेश जयराम पलबकर वय.३१ रा.आंबेवाडी कोलाड
हा फिर्यादी वडील जयराम परबलकर यांना रविवारी दि.३१ मार्च रोजी सांगितले की,मी संभे येथे क्रिकेट बघण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला तो दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत परतलाच नसल्याने  त्याचा घराच्यानी शोध घेतला असता सोमवार दि.१एफिल रोजी सकाळच्या सुमारास त्याची स्क्रुटी एम एच 06 सी ई २८४७ ही पुई गावच्या हद्दीत कॅनल च्या बाजूला आढळून आली.तर जयेश परबलकरचा मृत्यू देह
पुई कालव्यात आढळून आला.तरी हा जयेश तिथे कशाला आला होता.त्याला काही नैराश्य होते ? याचा तपास कोलाड पोलीस करीत असून
                        या घटनेची नोंद कोलाड पोलीसात रजि.०६/२०१४ सी आर पी कलम १७४ नुसार करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *