तटकरे तंत्रनिकेतन मधील १३ विद्यार्थ्यांची बजाज
कंपनी मध्ये निवड !
कोलाड ( कल्पेश पवार)
कोलाड गोवे येथील श्रीमती गीता द.तटकरे तंत्रनिकेत मधील मॅकॅनिकल व इलेक्ट्रिक या शाखेत
शिक्षण घेत असलेल्या १३ विद्यार्थ्यांची बजाज या नामांकित कंपनी मध्ये निवड करण्यात आली आहे.
तटकरे तंत्रनिकेतन हे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणा बरोबरच विविध ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.बजाज कंपनीने कॉलेज कॅपस मध्ये मंगळवार दी.२ एफिल रोजी नोकरी मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात इंटरव्हीव घेहून
मॅकॅनिकल मधील वैभव चोगले,विनय ठमके,आयुश जाधव,रुपक पाटिल,जय सावकार,प्रतीक चवले,त्रिशा गावड,ओम इंगावले,,काशीद जोशी, अक्षय मोरे तर इलेक्ट्रिकल मधील विणेश वगरे,धनंजय पाटिल,आदित्य पवार,या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देहून त्यांची नोकरी साठी पुणे चाकण येथील बजाज कंपनी येथे निवड करण्यात आली आहे.यावेळी कंपनी चे अधिकारी रवींद्र वाघचरी उपस्थित होते
या विद्यार्थ्यांची निवड होताच तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त संदीप तटकरे,रजिस्टार अजित तेलंगे,प्राचार्य विपुल मसाल व विभाग प्रमुख रुपेश पवार नेहा नागोठकर तसेच शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत