नरेंद्र माळी सरांचा सेवापुर्ती व सत्कार सोहळा उत्साहात

नरेंद्र माळी सरांचा सेवापुर्ती व सत्कार सोहळा उत्साहात

खांब,दि.२८(नंदकुमार मरवडे)

गेली तीस वर्ष अविरत ज्ञानदानाचे कार्य करून नरेंद्र माळी सर सन्मानाने सेवानिवृत्त झाले. देवकान्हे, बाहे, धानकान्हे, चिल्हे, तळवली पंचकृषीत नरेंद्र माळी सरांचा सेवापुर्ती सोहळा माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या दिमाखात साजरा केला. माळी सर म्हणजे संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, उत्तम संघटन शैली, आदर्श शिक्षक, यशस्वी क्रीडापट्टू, प्रशासनाची जान असणारे कुशल व्यक्तिमत्व, गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे. गेल्या तीस वर्षात हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या पंचकृषीला विद्येच्या रूपात लाभलेले एक वरदानच असा उल्लेख श्रमिक विद्यालयाच्या पटांगणात उपस्थितीतांनी व्यक्त केला. माजी विद्यार्थी 1994 ते 2025 पर्यंतच्या दहावीच्या तीस बॅचचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी व पंचकृषीतील जनसमुदाय पाहून माळी सर भावुक झाले होते. माळी सरांचे सावर्डे कॉलेजचे प्राचार्य शशिकांत नलावडे सुद्धा म्हणाले कि, बी. एड ला हा माझा विद्यार्थी असताना मी त्यांना ओळखले होते कि नरेंद्र माळी ज्या शाळेत जातील तेथील शाळेबरोबर पंचकृषित व तालुक्यात आपली ओळख निर्माण करतील असे म्हणाले होते आणि आज ते खऱ्या अर्थाने सत्यात उतरल्याचे पहायला मिळाले म्हणून या क्षणी मी खऱ्या अर्थाने धन्य झाल्याचे समाधान वाटते.

यावेळी प्रा.शशिकांत नलावडे,जि.प.मा.सदस्य संजय जांभळे, चेअरमन महेंद्र पोटफोडे, सचिव धोंडू कचरे, संचालक रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, बाबुराव बामणे, शंकर म्हसकर, राम मरवडे, वसंत मरवडे, मारूती खांडेकर, खांब हायस्कुलचे मुख्याध्यापक सुरेश जंगम, चिल्हे हायस्कुलचे मुख्याध्यापक दीपक जगताप, विठ्ठलवाडी मुख्याध्यापिका मरवडे मॅडम, सरपंच रवींद्र मरवडे, मा.उपसरपंच सूरज कचरे,बोरी सरपंच विक्रम पाटील, गजानन भोईर,धनाजी लोखंडे,संजय भिसे, अनंत थिटे, गजानन बामणे, मंगेश भोईर, पंचकृषीतील ग्रामस्थ व गेल्या तीस वर्षातील माजी विद्यार्थी उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यापैकी 1994 च्या बॅच पासूनच्या विद्यार्थी राजेश थिटे, मधुकर आगळे, शिल्पा सुटे, संदीप भोईर, रविंद्र मरवडे, ताई शेडगे, सुषमा जाधव, प्रवीण माहित, सुनील शेडगे, मंगेश ठाकूर, यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.अनेकजन भावुक झाले होते. आपल्या लाडक्या शिक्षकाला सेवानिवृत्त होत असल्याचे ऐकल्यावर विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, बाहेरील देशातून माजी विद्यार्थी माळी सरांच्या सेवापुर्ती व सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. माजी विद्यार्थिनी शिल्पा सुटे हिने माळी सरांच्या शालेय सेवेतील जीवनपटावरील एक चित्रफीत उपस्थितांना दाखविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे सर यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संस्थेच्या सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *