अंधश्रद्धा निर्मूलनाचे खरे कार्य शिवाजी राजांनी केले–किशोर काळोखे

अंधश्रद्धा निर्मूलनाचे खरे कार्य शिवाजी राजांनी केले–किशोर काळोखे
शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन
खांब,दि.३०(नंदकुमार मरवडे)
छत्रपती शिवाजी महाराजांनी अमावस्या -पौर्णिमेचा विचार न करता येईल तो दिवस शुभ मानून आदर्शवत राज्यकारभार केला असल्याने
अंधश्रद्धा निर्मूलनाचे खरे कार्य छत्रपती शिवाजी राजांनी केले असल्याचे विधान व्याख्याते तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर काळोखे (सातारा)
यांनी केले.
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथे संपन्न झालेल्या शिवजयंती सोहळ्यानिमित्त आपल्या व्याख्यानाचे वेळी उपस्थितीतांना संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडिक, सदस्या निलम मरवडे,मा.सरपंच वसंत मरवडे, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बामणे, एकनाथ मरवडे, अजित चितळकर, प्रशांत नागांवकर,मनोज शिरोडकर, मारूती बामणे, निखिल मरवडे, सतिश कोस्तेकर, सुशांत मरवडे,सुभाष बामणे,किसन बामणे, शशिकांत मरवडे,भूषण मांगुळकर, गणेश नागांवकर,अरविंद भिलारे,निलेश मरवडे, धनाजी मरवडे , ज्ञानेश्वर शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना किशोर काळोखे यांनी
आपली प्रत्येकाची खरी ओळख ही आपले कार्य व वागणूक यातून दिसून येते,त्यामुळे
फॅशनवर आपले व्यक्तिमत्व ठरत नाही
शेताला खत,समाजाची पत घरातले मत ज्याला मिळते तेच खरे व्यक्तिमत्त्व समजावे तर
चांगली नीतिमत्ता बाळगा प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी राजे जन्माला यायला वेळ लागणार नाहीत.असे शेवटी त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *