
गावठाण येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
खांब,दि.२८(नंदकुमार मरवडे)
गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या रोहा तालुक्यातील शिवमुद्रा मित्र मंडळ, गावठाण आयोजित संस्कृतीक कार्यक्रम २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांची यशस्वी परंपरा राखत याही वर्षी या मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्कृतीक कार्यक्रम, फनी गेम्स व गावठाण प्रिमियर लिगचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून खेळीमेळीच्या वातावरणात अबालवृधानी सहभाग घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. सकाळच्या सत्रात क्रिकेट लीग, सायंकाळच्या सत्रात फणी गेम्स व रात्रीच्या सत्रात संस्कृतिक कार्यक्रम अशाप्रकारे विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न करण्यात आले.यावर्षीच्या संस्कृतीक कार्यक्रमामध्ये
अलिकडेच वारकरी संप्रदायतील सर्वांचे लाडके बापू सर्वांना सोडून गेले.त्यांना सादर करण्यात आलेले सर्व कार्यक्रम समर्पित करण्यात आले. तसेच बापूंवर अधारित माईबाप बापू
एक नाटक सुद्धा सादर करण्यात आले.त्यामधून संप्रदयातील त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. व बापूंना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सल्लागार दत्ता सानप यांनी केले.तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.