निलेश खामकरच्या एकाकी निधनाने खांब गावावर पसरली शोककळा

निलेश खामकरच्या एकाकी निधनाने खांब गावावर पसरली शोककळा
खांब,दि.११(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील खांब गावातील हरहुन्नरी तरूण निलेश बाळाराम खामकर याच्या ता.१० मार्च रोजी झालेल्या एकाकी दु:खद निधनाने खामकर परिवारासह खांब गावावर शोककळा पसरली आहे.तर संपुर्ण रोहा तालुक्यातून देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वय वर्षे अवघे ३३ व विवाहित असलेल्या निलेश खामकरला क्रिकेट खेळाचा मोठा छंद होता.गावातील क्रिकेट संघात तो अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने अनेकवेळा संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता.आपल्या रोजीरोटीसाठी धाटाव औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत निलेश एक कामगार म्हणून काम करीत होता.काही दिवसांपूर्वी आजारी पडल्याने त्याच्यावर माणगाव,रोहा येथे उपचार करण्यात आले.परंतू तबीयतीमध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याने मुंबई येथे एका इस्पितळात दाखल करण्यात आले.तेथेही चार पाच दिवस उपचार केल्यानंतर शरीर प्रकृतीने साथ दिली नसल्याने अखेर ता.१० रोजी त्याची मृत्यूशी चाललेली झुंज संपून त्याची प्राणज्योत मावळली.त्याच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या परिवारासह अनेकांना शोक अनावर झाला होता.अखेर खांब येथील
स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात
निलेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी,दोन मुले,एक भाऊ,चुलते,चुलत भाऊ,बहिणी असा परिवार असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *