वरदा तटकरे यांच्या हस्ते मुठवली खु.येथे महिलांचा सन्मान

वरदा तटकरे यांच्या हस्ते मुठवली खु.येथे महिलांचा सन्मान
खांब,दि.१२(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील मुठवली खु.येथे वरदा तटकरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून यथोचित सन्मान करण्यात आला.
राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या सहयोगाने व येथील युवा कार्यकर्ते महेश तुपकर,घन: श्याम कराळे, मारूती तुपकर,योगेश शिंदे,अनिल आयरे यांच्या संकल्पनेतून तसेच मालसई ग्रा.पंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी सन्मान व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.वरदा सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या तसेच विभा चोरघे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका सौ.वेळे,मालसई शिक्षिका पुष्पलता शिंदे,आशा सेविका मंगल शिंदे, अंगणवाडी सेविका शारदा तुपकर, संजना मालुसरे, सुचिता शिंदे, तृप्ती ठाकूर, राजेश्री खरिवले,गतिशा गायकर, सुरेखा मोरे, वंदना कोल्हटकर,पूजा गायकर आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी
सरपंच मयुरी तुपकर,उपसरपंच निलेश मालुसरे,
संजय मालुसरे ग्रा.पं.सदस्य कविता शेळके,उस्मिता मानकर,ग्रा.सेविका रेश्मा वेटकोळी,शिल्पा मरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रा.पं.हद्दीतील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिला वर्गाला हळदीकुंकूवाचे वाण व भेटवस्तू देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार नंदकुमार मरवडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *