जीवनधारा संस्थेच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

जीवनधारा संस्थेच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

खांब-कोलाड,दि.११(नंदकुमार मरवडे/कल्पेश पवार)

दिनांक 9/3/2024 रोजी जीवनधारा संस्था कोलाड या ठिकाणी महिला दिन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची विशेष थीम “ नारी घे तू उंच भरारी” अशी ठेवण्यात आली होती .या महिला दिनासाठी एकूण 36 आदिवासी वाडी मधून 500 महिला , 50 पुरुष व 50 युवक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोलाड पोलीस निरीक्षक मा .श्री .नितीन मोहिते सर व त्यांचा स्टाफ . रोहा पोलीस स्टेशनचे समुपदेशक कमलेश चांदेकर सर , विद्या पाटील , जिल्हा संरक्षण अधिकारी विनायक महाडिक सर , अशोक पाटील सर पर्यवेक्षक अधिकारी अलिबाग , राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष मा. सौ प्रीतम ताई पाटील , जीवनधारा संस्थेच्या संचालिका हिल्डा फर्नांडिस मा . डॉ वरुटे मॅडम , ठाकूर मॅडम , डॉ.नेहा पडवळ वरसगाव ग्रामपंचायत सरपंच सौ विशाखा राजीवले, वरसगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक रवींद्र ठाकूर, रोहा चर्च चे रुडाल्ड फादर, सीएसए चे रुचिका मॅम व सचिन सर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
या कार्यक्रमानिमित्त साधन व्यक्ती म्हणून लाभलेले जिल्हा संरक्षण अधिकारी विनायक महाडिक सर व रोहा पोलीस स्टेशनचे समुपदेशक कमलेश सर व त्यांची टीम यांनी महिलांवर होणारे अत्याचार व त्यावर कसे संरक्षण करावे या विषयावर माहिती दिली तसेच मा. प्रीतम ताई पाटील यांनी सुद्धा महिला व मुली यांना लागू होणाऱ्या योजनांविषयी माहिती दिली या कार्यक्रमासाठी 36 आदिवासी वाड्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासी व निसर्गावर अवलंबून असणारे नृत्य व नाटिका सादर करण्यात आल्या . तसेच ज्या महिला स्वतः पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय चालू केला त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले . सर्व महिलांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला.
त्या नंतर बक्षीस वितरणाचाकार्यक्रम पार पाडण्यात आला.तसेच ज्या महिलांनी सुंदर डान्स केले त्यांना ट्रॉफी व गिफ्ट देण्यात आले कार्यक्रमाचे शेवटी सौ.सुरेखा गुजर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *