
पत्रकार अल्ताफ चोरढेकर यांना पितृशोक
प्रतिनिधी- कल्पेश पवार ;-
रोहा येथिल दैनिक सागर कार्यालयाचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार आणि रोहा नगर पालिकेचे माजी नगरसेवक अल्ताफ चोरढेकर यांचे वडिल दाऊद इस्माईल चोरडेकर यांचे शनिवारी दि. 10 फेब्रु. रोजी सायंकाळी यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 82 वर्षाचे होते. अत्यंत प्रेमळ आणि शांत स्वभाव सहकार्याची भावना असलेल्या पै. दाऊद चोरढेकर यांचे निधनाची वार्ता समजल्यावर अष्टमी आणि परिसरात हळहळ व शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली जावई सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे. रविवारी सकाळी निघालेल्या अंत्ययात्रेत राजकीय, व्यापारी, पत्रकार आदी विविध स्तरातील मान्यवरांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.