कोलाड पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृती

पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृती
कोलाड-कल्पेश पवार
             रोहे तालुक्यातील कोलाड पोलीस च्या मार्फत
द.ग.तटकरे हाईस्कूल च्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली.
          आजची तरूणाई ही अंमली पदार्थ च्या विळख्यात सापडत असल्याने त्याना वेळीच आला घालण्यासाठी कोलाड पोलिसांच्या वतीने शुक्रवार दि.९ फेफ्रुवारी रोजी कोलाड येथील द.ग.तटकरे हाईस्कूल व. ज्युनिअर कॉलेज येथे व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या या विषयावर ७वी ते १० वी.विद्यार्थ्यांकरिता पोस्टर स्पर्धा व ११ते १२ वी चे विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा घेण्यात आली सदर स्पर्धेत दोन्ही गटांमध्ये ४०/४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
             यावेळी दोन्ही गटातून ६ विद्यार्थी विजय झाले  त्याना सन्मानित करण्यात आले.कोलाड पोलीस सपोनि नितीन मोहिते,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर यावेळी नरेश पाटील व सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *