खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते नडवली येथील मंदिराचा लोकार्पण सोहळा

खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते नडवली येथील मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न
खांब-कोलाड,दि.२०(नंदकुमार मरवडे/कल्पेश पवार)
रोहा तालुक्यातील नडवली येथील
विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे लोकार्पण सोहळा
रायगडचे खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते
मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आ.अनिकेत तटकरे यांच्या विकास निधीतून व खा.सुनील तटकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून सदरील मंदिर सभागृहाचे बांधकाम पुर्ण झाले असून या मंदिराचा लोकार्पण सोहळा खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते ता.१९ रोजी संपन्न करण्यात आला.यावेळी जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर,नारायण धनवी, गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे, जेष्ठ नेते प्रकाश थिटे,राम मरवडे, बाबुराव बामणे, सुरेश महाबळे,माजी सरपंच मनोज शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला अध्यक्षा प्रितम पाटील,पं.स.माजी सभापती वीणा चितळकर, सरपंच कांचन मोहिते,संजय भिसे,नरेंद्र जाधव, रविंद्र मरवडे, मारूती खांडेकर,संजय मांडलुस्कर, नरेंद्र पवार, विश्वनाथ धामणसे,राजेश कदम, गजानन बामणे, दत्ता वातेरे,सूरज कचरे, संदीप महाडिक, उत्तम बाईत,सुरेखा पार्टे, मानसी चितळकर,निलम वाळंज आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
निवडणूका येतात आणि जातात
पण विकासाची लढाई कधीही संपत नसते.त्याच हेतूने या खांब परिसराचा सर्वदूर विकासाच्या ध्येयासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ग्वाही खा.सुनील तटकरे यांनी देऊन
गावाच्या अध्यात्मिक वाटचालीसाठी हे मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे शेवटी त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच मनोज शिर्के यांनी केले.तर संपुर्ण कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच तरूण मंडळ व मुंबई तसेच ठाणे मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *