बारशेत येथून शैलेश कदम बेपत्ता ! परिसरात कोणाला आढळून अल्यास संपर्क साधण्याचे रोहा पोलिसांचे आहवान !
रोहा-कल्पेश पवार
शैलेश सहादेव कदम हे आई चंद्रभगा हिला बाहेर जावुन येतो असे सांगुन घरातुन कोठेतरी निघुन गेला.तो अदयाप पर्यंत घरी परतले नसुन रोहे परिसरात कोणाला आढळून आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आहवान करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,परशुराम सहादेव कदम वय- ५५ वर्षे, व्यवसाय- शेती,रा.बारशेत,यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार,त्यांचा भाऊ नाव शैलेश सहादेव कदम वय-५२ वर्षे रा. बारशेत, पो. वाली, ता. रोहा, जि. रायगड, हे ०७/०६/२०२३ रोजी ०८.०० वाजण्याच्या सुमारास मौजे बारशेत,येथील घरातून आई चंद्रभगा हिला बाहेर जावुन येतो असे सांगुन घरातुन कोठेतरी निघुन गेला.तो अदयाप पर्यंत घरी परतले नाहीं तरी त्यांचा वर्णन उंची ६ फुट, रंग- सावळा, केस काळे समोर साधरण टक्कल, चेहरा- उभट, नाक-सरळ, डोळे-काळे, अगांने सडपातळ, अंगात नेसुस- फुल शर्ट व फुल पॅट, पायात चप्पल असे वर्णन असून तरी अश्या वर्णाचा इसम कुठे आढळल्यास त्यांनी लगेचच रोहे पोलीस स्टेशन जवळ संपर्क साधावा असे आहवान पोलिसांनी केले आहे.
रोहे पोलिसांत याची नोंद म.मि.रजि.नंबर ३३/२०२३ नुसार करण्यात आली असून अधिक तपास
एन. बी. सावरटकर पोना/२३६५ रोहा पोलीस ठाणे मो. नं. ७३५०२२१९९९ रोहा पोलीस ठाणे दुरध्वनी क्र. :- ०२१९४-२३४९३३ यांच्या जवळ संपर्क साधला असे आहवान करण्यात आले आहे.