शिरवली येथे श्री रामाचा जयघोष –
सरपंच महेंद्र पोटफोडे यांचा ही सन्मान
कोलाड-कल्पेश पवार
श्री राम जन्मभूमी अयोध्येत प्रभू रामचंद्र ता.२२ रोजी एका भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले.त्या पार्श्वभूमीवर शिरवली येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तसेच यावेळी सरपंच महेंद्र पोटफोडे यांचा ही सन्मान करण्यात आला.
सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर श्री राम जन्मभूमी अयोध्येत प्रभू रामचंद्र ता.२२ रोजी एका भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले.त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मोठ्या उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील शिरवली येथे कार्यक्रमाच्या पुर्वसंध्येला गावातील आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला.महिलावर्गाने अधिक पुढाकार घेऊन या सोहळ्याची अधिक शोभा वाढविण्यासाठी मिळेल ती जबाबदारी पार पाडली.तर २२ जाने.रोजी श्रीरामाच्या प्रतिमेची मांडणी करून विधीवत पूजन करण्यात आले.तसेच ग्रामदैवतांचेही पूजन करून श्रीरामाचा अखंड जयघोष करून व हरिनामाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी तरूणाईच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी महिलांचा हळदी कुंकू,राम रक्षा मंत्र जप,करण्यात आले.तर शिरवली येथील तलाव शुशोभिकरनाला 1 कोटी निधी मंजूर करून आणल्याने सरपंच महेंद्र पोटफोडे यांचा गावाच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी भाई पोटफोडे,मंगेश पोटफोडे, भाऊ पोटफोडे, संजय शेळके,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.तद्नंतर महाप्रसाद व जागर भजनाने या सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली.महेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने मेहनत घेतली.