जिजाऊ संस्थेचे राज्य अध्यक्ष निलेश सांबरे व मारूती महाराज कोलाटकर यांचा सन्मान
खांब,दि.१७(नंदकुमार मरवडे)
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे व रायगड भूषण मारूती महाराज कोलाटकर यांच्या कार्याप्रती कृतार्थ होऊन रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथे त्यांचा शाही सन्मान करण्यात आला.
येथील ग्रामस्थ मंडळाचे वतीने सामाजिक कार्यकर्ते मनोज मरवडे यांच्या संकल्पनेतून
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचा व रायगड भूषण ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर यांना आयोध्येतील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर रायगड सरपंच रविंद्र मरवडे, माजी सरपंच वसंत मरवडे,मा.उपसरपंच गजानन बामणे, रघुनाथ कोस्तेकर, पंचक्रोशी उपाध्यक्ष प्रकाश थिटे,गाव अध्यक्ष वासुदेव मरवडे,धनाजी लोखंडे, धोंडू कचरे,महादेव माहित, डॉ.जनार्दन वरखले, पांडुरंग गोसावी, कृष्णराम धनवी, सदानंद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी मनोगत व्यक्त करताना,कोकणातील १०० मुले आयएएस जेव्हा होतील व्हावा तेव्हाच आपणास खरे स्वातंत्र्य मिळेल असे सांगताना प्रशासनात कोणीही कोकणी माणूस नाही याबाबत श्री.सांबरे यांनी खंत व्यक्त करताना कोणीही उपचाराविना राहू नये यासाठी व प्रत्येक माणूस घडला पाहिजे यासाठी जिजाऊ कार्य करते.असे सांगतानाच मला अडीच एकर जागा द्या तिथे आपण सीबीएसई बोर्डाचे विद्यालय सुरू करू. अशाप्रकारचे आवाहन शेवटी त्यांनी केले.या संपुर्ण कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ तळवली तर्फे अष्टमी व जय हनुमान क्रीडा मंडळ तसेच मुंबईकर मंडळ व आदिवासीवाडी ग्रामस्थ यांनी मोलाचे योगदान दिले.