जीडीटी फ्युचर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सुडकोली येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा

जीडीटी फ्युचर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सुडकोली  येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा
कोलाड-कल्पेश पवार
                         तटकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळाची सुडकोली चणेरा येथील जीडीटी फ्युचर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यात आले.
                      शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांचे विविध गुण दर्शविण्याचे प्लॅटफॉर्म. याही वर्षी 13 जानेवारी रोजी व्हायब्रंट नावाचा वार्षिक स्नेहसंमेलन राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शेकडो पालक व पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाची थीम व्हायब्रंट असून देशातील विविधता दर्शवत प्रत्येक राज्याचे नृत्य प्रस्तुत करण्यात आले. शाळेत शिकत असलेले सेल्फ डिफेन्स अंतर्गत लाठीकाठी चे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या नाटिकेतून केले.जवळजवळ दोन तास चालणाऱ्या या कार्यक्रमाला पालकांनी टाळ्यांच्या गजराने उस्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष संदीप तटकरे व त्यांच्या अर्धांगिनी सौ ऋतुजा तटकरे लाभले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत चणेऱ्या मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून समाधान वाटते आहे असे सांगितले. तसेच पुढे अशाच प्रकारचे उपक्रम ही शाळा राबवीत राहील असे आश्वासन दिले.
              शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नुरीना शिंगरे यांनी वार्षिक रिपोर्ट प्रोजेक्टर द्वारे सादर केला. वर्षाच्या सुरुवातीपासून राबविलेले उपक्रम घेतलेल्या विविध परीक्षा तसेच कार्यक्रम यांची डिटेल्स या प्रेझेंटेशन मध्ये सौ शिंगरे यांनी मांडल्या.कार्यक्रमाला तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे रजिस्टर अजित तेलंगे, एमडीएम स्कूल आणि जीडीटी स्कूलचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर देवेंद्र चांदगावकर,
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर विश्वास देशमुख, एमडीएन फ्युचर स्कूलच्या मुख्याध्यापिका योगिनी देशमुख,  गीता द तटकरे उच्च माध्यमिक चणेराच्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी केसरकर, व तटकरे इन्स्टिट्यूट च्या विविध युनिट्स चे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *