अयोध्या सोहळ्यानिमित्त तळवली येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

अयोध्या सोहळ्यानिमित्त तळवली येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
खांब,दि.२३(नंदकुमार मरवडे)
सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर श्री राम जन्मभूमी अयोध्येत प्रभू रामचंद्र ता.२२ रोजी एका भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले.त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मोठ्या उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथेही अयोध्या सोहळ्यानिमित्त विविध प्रकारच्या धार्मिक तथा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
हर घर अयोध्या,हर मंदिर अयोध्या अशाप्रकारे या उत्सवाला स्वरूप आल्याने या कार्यक्रमाच्या पुर्वसंध्येला तळवली तर्फे अष्टमी गावामध्ये संपुर्ण ग्राम स्वच्छता अभियान राबवून गाव व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला.महिलावर्गाने अधिक पुढाकार घेऊन या सोहळ्याची अधिक शोभा वाढविण्यासाठी मिळेल ती जबाबदारी पार पाडली.तर २२ जाने.रोजी श्रीरामाच्या प्रतिमेची मांडणी करून विधीवत पूजन करण्यात आले.तसेच ग्रामदैवतांचेही पूजन करून महाआरती व जप करण्यात आला. सायं.ग्रामस्थ,तरूण मंडळ व महिल यांच्या वतीने श्रीरामाचा अखंड जयघोष करून व हरिनामाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी तरूणाईच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.याच कार्यक्रमात ह.भ.प.मदन महाराज कोलाटकर यांचे श्री रामाचे जीवन व चरित्र यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.तद्नंतर महाप्रसाद व जागर भजनाने या सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *