रोहा प्रेस क्लब वतीने डॉ.सी.डी.देशमुख यांच्या जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन

रोहा प्रेस क्लब वतीने डॉ.सी.डी.देशमुख यांच्या जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन
रोहा,दि.१०(प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मातृ संस्था असलेल्या रायगड जिल्हा प्रेस क्लब संलग्न रोहा प्रेस क्लबच्या वतीने
रोह्याचे सुपुत्र स्व.डाॅ.सी.डी.तथा चिंतामणराव देशमुख यांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधत रवि.दि.१४ जाने.२०२४ रोजी सायं.५:३० वा.श्री.राम मारूती चौक, रोहा.येथे भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
         सामाजिक बांधिलकी जपणारी तसेच शैक्षणिक कला – क्रीडा सांस्कृती वारसा जोपासणारी क्रियाशील पत्रकार संघटना असलेल्या रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान,अभिनव रोहा,शिवचरण मित्र मंडळ, राजमुद्रा फाऊंडेशन,स्पंदन नाट्यसंस्था,मावळा प्रतिष्ठान,रोटरी क्लब ऑफ रोहा व श्री कृपा फाऊंडेशन यांच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री.राम मारूती चौक,रोहा येथे भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेसाठी लहान गट(इ.८ वी ते १२ वी) विषय १)वनवा–दुर्लक्षित पण चिंताजनक विषयाची चिकित्सा,२.)नैसर्गिक शेती –आजची गरज,३.)आजचा युवक क्रिकेट,कबड्डी,राजकारण की नोकरी प्राधान्य,
४.)डाॅ.सी.डी.देशमुख–राजकीय प्रवास व आजचे राजकारण,५.)नदी मरत नाही,मारली जाते हे विषय ठेवण्यात आले आहेत.तर
खुला गट(१२ वी पासून पुढे) या गटासाठी १)धाटाव एमआयडीसीला ठेकेदारी शाप की वरदान ,२)राममंदिर–रामराज्य अजून कुठवर ?
३)लग्न समारंभ– दारू-मटणावली प्रतिष्ठा योग्य की अयोग्य,४)पत्रकारिता–समाजाची आजची अपेक्षा,५)डिजिटल व्यवहाराने बदललेले आजचे अर्थकारण व ६)स्वातंत्र्योत्तर ७६ वर्षांनंतर आरक्षणाची आवश्यकता आहे का ? आदी विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेची नाव नोंदणी
व अधिक माहितीसाठी रोशन चाफेकर मो.नं.८८८८०५६०९३,नंदकुमार मरवडे मो.नं.८३०८६८८२२९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *