
कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष अनंत थिटे यांना पितृवियोग
खांब-कोलाड,दि.७(नंदकुमार मरवडे/कल्पेश पवार)
रोहा तालुका कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष
अनंत थिटे यांचे वडील बाळू गंगाराम थिटे यांचे
शनि.दि.६ जाने.रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
बाळू थिटे हे कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून सर्वपरिचित होते.त्यांनी हयातीत शेती क्षेत्राला विशेष प्राधान्य देऊन आपल्या सर्व मुलांनाही सुसंस्कारित केले.तसेच संपुर्ण आयुष्यात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक कार्यातही अग्रेसर राहिले.त्याचप्रमाणे गावातील विकास कामातही त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असायचा.त्यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच सर्वश्री शिवराम शिंदे,सुरेश मगर,
बाबुराव बामणे,दत्ताराम झोलगे, शिवराम शिंदे, खांडेकर सर,ज्ञानदेव भोईर, यशवंत रटाटे,राम मरवडे,दगडू बामुगडे,दिनकर सानप, सुधीर बारस्कर,गणेश खरिवले, सुहास खरिवले, महेश बामुगडे, सतिश भगत, रविंद्र मरवडे,संतोष भोईर,मुकेश भोकटे, शशिकांत कडू, किशोर जाधव, श्याम लोखंडे,अजय कापसे,नंदू कलमकर,सुशील खांडेकर, दत्ता भोईर,केशव भोकटे,दिनेश रटाटे, संतोष खेरटकर,खेळू ढमाळ, दयाराम मरवडे, दयाराम भोईर,महेश तुपकर,विजय पवार,विनोद बाईत आदींसह त्यांचे आप्तस्वकीय मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,चार मुली,सुना,जावई व नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी सोम.दि.१५ जाने.रोजी तर अंतिम धार्मिकविधी गुरू दि.१८ जाने.रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.