रोह्यातील २४ वर्षीय तरुणाकडे सापडला शस्त्र साठा स्थानिक गुन्हे शाखा रायगडची धडक कारवाई

रोह्यातील २४ वर्षीय तरुणाकडे सापडला शस्त्र साठा
स्थानिक गुन्हे शाखा रायगडची धडक कारवाई
प्रतिनिधी-कल्पेश पवार
                  सोमवारी रात्रौ अलिबाग गुन्हे अन्वेषण शाखेने पकडलेल्या धाडीत बेकायदेशीर शस्त्र साठ्याचा संग्रहच सापडल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. रोहा शहरातील धनगर आळीतील तन्मय भोकटे याच्या घरात हा अवैध शस्त्रसाठा आढळून आला.
                 दिनांक 08.01.2024 रोजी रात्री स्थनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनीय खबर प्राप्त झाली की, रोहा धनगर आळी रोहा याठिकाणी एक इसमाकडे अग्नी शस्त्रे असल्याची माहितीप्राप्त झाली त्यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे व कर्मचारी यांचे पथक तयार केले सदर पथका सह मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार धनगर आळी रोहा याठिकाणी जावून पथकाने पाहणी केली असता त्यावेळी सदर ठिकाणी एक इसम नामे तन्मय सतीश भोपटे वय-24 वर्ष रा.धनगर आळी ता.रोहा हा मिळून आला त्याचे घरामधे  खालीलप्रमाणे शस्त्रे साठा मिळून आला.
     हस्तगत केलेला माल-
(1)  4 बारा बोर बंदूक
(2) 1 देशी बनावटीचे रिव्हॉल्वर
(3) 5  धारदार चाकू
(4) 2  धारदार तलवारी
(5) 6 कोयते
(6) 90 जिवंत काडतुसे
(7) 5 रिकामे काडतूस
(8) बंदूक व काडतुसे बनवण्याचे साहित्य
(9) हरीण व इतर प्राण्यांचे  22 शिंगाचे जोडी
        सदर ठिकाणी 2 पंचांना पाचारण करुन वर नमूद शस्त्रे पंचनामान्वये ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी याने देशी बनावटीचे रिव्हॉल्वर विकत घेतले असल्याचे सांगितले आहे तसेच बाकी इतर सर्व बंदुका तलवारी कोयते चाकू स्वतः बनवलील्याचे सांगितले आहे तसेच घटनास्थळवरून शस्त्रे बनविण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले असून ते ही ताब्यात घेण्यात आलेले आहे.
         सदर बाबत रोहा पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं.08/2024 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,4,5(क),(ख),7(क),(ख),25 वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2 (31), 48,51 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी नामे तन्मय सतीश भोपटे वय-24 रा.धनगरआळी ता.रोहा यास अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साठे व  पथक  करीत आहे.
        सदरची कामगिरी रायगड जिल्हयाचे मा.पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे साहेब, मा.अपर पोलीस अधिक्षक, अतुल झेंडे साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोह/जितेंद्र चव्हाण, पोह/रुपेश निगडे,पोना/विशाल आवळे,पोशी/अक्षय सावंत, पोशी/मोरेश्वर ओमले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *