अनंत शिर्के यांचे दु:खद निधन खा. सुनील तटकरे व मा.आ.सुरेश लाड यांनी केले सांत्वन

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत शिर्के यांचे दु:खद निधन
खा.सुनील तटकरे व मा.आ.सुरेश लाड यांनी केले सांत्वन
खांब-दि.३०(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील नडवली गावचे प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते तथा पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त अधिकारी असणारे अनंत गणपत शिर्के यांचे शुक्र.दि.२९ डिसें.रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने खांब येथील निवासस्थानी दु:खद निधन झाले.ते पं.समिती माजी सभापती अनिता शिर्के यांचे पती व मा.सरपंच मनोज शिर्के व महेश शिर्के यांचे वडील होत.
        अनंत शिर्के यांनी आपल्या हयातीत
पाटबंधारे विभागात शासकीय सेवा करून
कोलाड व कर्जत येथे प्रामाणिकपणे सेवा करून आपल्या सेवेचा कार्यकाल पुर्ण करून सन्मानाने सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले होते.त्यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच
रायगड जिल्ह्याचे खा.सुनील तटकरे, कर्जतचे मा.आ.सुरेश लाड यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.तसेच यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला सर्वश्री विनोद पाशिलकर,अनिल भगत,शिवराम शिंदे, बाबूराव बामणे, रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे,महेंद्र पोटफोडे,अनंत थिटे, राजेंद्र शिंदे,भाऊ पोटफोडे,मारूती खरिवले, वसंत मरवडे,राम शेलार, शिवराम महाबळे,राम मरवडे, नंदकुमार कापसे,राम कापसे,नारायण धनवी, रामचंद्र सकपाल, राजेंद्र पोकळे, राकेश शिंदे,संजय माऔडलुस्कर,विश्वनाथ धामणसे, जयवंत मुंडे,संजय राजिवले, सतिश भगत, अमित मोहिते, नरेंद्र जाधव, नरेंद्र पवार, चंद्रकांत लोखंडे,सुशील शिंदे,मारूती खांडेकर, शांताराम महाडिक, रविंद्र मरवडे, प्रमोद लोखंडे, दत्ताराम मंचेकर,महेश निळेकर, रघुनाथ कोस्तेकर,महादेव माहित,धोंडू कचरे आदी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह फार मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
      त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,एक मुलगी
सुना,जावई,भाऊ,बहिण, नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी रवि.दि.७ जाने.तर अंतिम धार्मिकविधी बुध.दि.१० जाने.रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *