आ.अनिकेतभाई तटकरे यांची पिंपळवाडी येथे श्री. दत्त जयंती उत्सव प्रसंगी सदिच्छा भेट

आ.अनिकेतभाई तटकरे यांची पिंपळवाडी येथे श्री. दत्त जयंती उत्सव प्रसंगी सदिच्छा भेट
खांब-रोहा,दि.२७(नंदकुमार मरवडे)
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आ.अनिकेतभाई
तटकरे यांनी रोहे तालुक्यातील विविध ठिकाणी संपन्न झालेल्या श्री.दत्त जयंती उत्सव सोहळा
प्रसंगी सदिच्छा भेट देण्याचा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न करण्यात आला.तर यावेळी त्यांनी देवकान्हे -पिंपळवाडी येथे भेट देऊन श्री.दत्तात्रयेंचे दर्शन घेतले.
तालुक्यातील विविध विभागात व गावागावात संपन्न झालेल्या श्री.दत्त जयंती उत्सव सोहळ्याप्रसंगी आ.अनिकेतभाई
तटकरे यांनी श्री.दत्त जयंती उत्सव कार्यक्रमात सदिच्छा भेटी देऊन श्री.दत्तात्रयांचे यथोचित पूजन करून मनोभावे ्दर्शन घेतले.तर या सदिच्छा भेट कार्यक्रमात त्यांनी खांब विभागातील देवकान्हे -पिंपळवाडी येथे साजरा करण्यात आलेल्या उत्सवात भेट देऊन पिंपळवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच तरूण मंडळाचे वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे जाहिररित्या कौतूक केले.यावेळी त्यांच्या समवेत पं.स.माजी उपसभापती बाबुराव बामणे,उपसरपंच सूरज कचरे,माजी सरपंच बाबू
माहित, सदस्य दयाराम भोईर, शांताराम आगळे आदी मान्यवर उपस्थित होते.याच कार्यक्रमात आ.अनिकेतभाई तटकरे यांनी येत्या वर्षभराचे आत श्री.दत्तात्रेय यांच्या मंदिर सभागृह बांधकाम पुर्ण झालेले असेल असे अभिवचन ग्रामस्थांना दिले.गेल्या १४ वर्षांपासून पिंपळवाडी येथे श्री.दत्त जयंती सोहळा विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे.आ.अनिकेतभाई तटकरे येथे भेट दिल्याने ग्रामस्थ मंडळ व तरूण मंडळ तसेच महिला मंडळ यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी पिंपळवाडी -देवकान्हे ग्रामस्थ यांच्या वतीने आ.अनिकेतभाई तटकरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *