तटकरे तंत्रनिकेतन येथे वर्चस्व क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

तटकरे तंत्रनिकेतन येथे वर्चस्व क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन
कोलाड – कल्पेश पवार
                   कोलाड गोवे येथील श्रीमती.गीता. द.तटकरे तंत्रनिकेत,व आय टी आय.येथे गुरुवार दि.४ जानेवारी रोजी संस्थेचे ट्रस्टी संदीप तटकरे यांच्या हस्ते
वर्चस्व २०२४ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन मोठया उत्साहात पार पडले.
             यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संस्थेचे ट्रस्टी संदीप तटकरे ,सचिव प्रकाश सरकले रजिस्ट्रार अजित तेलंगे,प्राचार्य विपुल मसाल,ITI चे प्राचार्य संजय हजारे,एम डी एन फ्यूचर स्कूलचे देवेंद्र चांदगांवकर, मुख्याध्यापिका सौ.योगिनी देशमुख,मुख्याध्यापक इंगळे सर,डॉ.नानासाहेब धर्माधिकारी कॉलेज चे प्राचार्य देशमुख सर,अमोल गोळीपकर,तसेच तटकरे ग्रुप ऑफ इंस्टीट्यूटचे सर्व विभाग प्रमुख,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
                    दरम्यान मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी
कोलाड येथील श्रीमती गीता द.तटकरे तंत्रनिकेतनमध्ये  ‘वर्चस्व’ या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.याचेच शानदार उद्घाटन ४जानेवारी रोजी प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत सकाळी १०:३० वाजता करण्यात आले आहे.यावेळी प्रथम दीपप्रज्वलन करून, त्यानंतर ज्योत प्रज्वलित करण्यात आली.तर मागील  शैक्षणिक वर्षात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यव रांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तर यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राज्यातील वेशभूषा करून भारतीय संस्कृतीचे सादरीकरण केले.
                       यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना,संस्थेचे ट्रस्टी संदीप तटकरे,रजिस्ट्रार अजित तेलंगे,प्राचार्य विपुल मसाल,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या वर्चस्व क्रीडा स्पर्धेत टेक्नीकल इवेंट यासह आउटडोअर खेळामध्ये,क्रिकेट,कबड्डी, खो-खो,धावणे, गोळाफेक,थाळीफेक,भालाफेक ,बॅट मॅटन,आदि मैदानी खेळ सादर होणार आहेत.यात सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला असून ही स्पर्धा दि. ४ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत सादर होणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारणार यांची उत्खनटा शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *