देवकान्हे गावच्या जनाबाई भोईर यांचे दु:खद निधन
खांब,दि.१८(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील देवकान्हे गावच्या रहिवाशी असणा-या जनाबाई कृष्णा भोईर यांचे सोम.दि.१८ डिसें.रोजी वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले.
जनाबाई भोईर या अतिशय प्रेमळ व शांत तसेच संयमी स्वभावाच्या होत्या.सामाजिक क्षेत्रात त्यांचा नेहमीचाच वावर असल्याने प्रत्येकाच्या सुख-दु:खात नेहमीच सहभागी असायच्या.त्यांनी आपल्या मुलांबाळांवर चांगले संस्कार केल्याने त्यांची मुलं व नातवंडांनी आज समाजात चांगले नावलौकिक मिळविला आहे.त्यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व आप्तस्वकीय मित्रपरिवार यांनी त्यांच्या अंत्ययात्रेला खुप मोठी गर्दी केली होती.त्यांचे दोन नंबरचे सुपुत्र संतोष भोईर हे खांब विभाग कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष असून सामाजिक क्षेत्रात नेहमीच चांगले योगदान देत आहेत.तसेच मोठे सुपुत्र धनाजी भोईर व छोटे सुपुत्र राजेश भोईर हे दोघेही सामाजिक क्षेत्रात नेहमीच कार्यरत असतात.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना,जावई, नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी बुध.दि.२७ डिसें.रोजी तर अंतिम धार्मिकविधी शुक.दि.२९ डिसें.रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.