तळवली तर्फे अष्टमी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
खांब,दि.२५(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी यांच्या वतीने रवि.दि.३१ डिसें.रोजी स.१० ते दु.१ या वेळेत हनुमान मंदिर सभागृह येथे मोफत आरोग्य शिबिर,उपचार व मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.आर.एन.पाटील ,सूरज हाॅस्पिटल सानपाडा नवी मुंबई यांच्या सहयोगाने व अक्षय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने तसेच डॉ.महेंद्र म्हात्रे व डॉ.बालाजी वाखरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन सरपंच रविंद्र मरवडे,उपसरपंच संदीप महाडिक यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं.सदस्य दयाराम मरवडे, हरिश्चंद्र मांगुळकर,निलम वाळंज,अनघा खांडेकर, तारामती पवार सुकेशिनी महाडिक आदी उपस्थित राहणार आहेत.तर या शिबिरात मेंदूंचे आजार, मणक्याचे आजार,मानसिक विकार,हृदयविकार आदी आजारांवर डॉ.एन.आर.पाटील, डॉ.उदय पाटील, डॉ.रेश्मा पाटील व डॉ.अंजली पाटील आदी तज्ञांकडून रूग्णांची तपासणी, मार्गदर्शन व मोफत उपचार करण्यात येणार आहेत.