रोह्यात सह्याद्री सहकारी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन

रोह्यात सह्याद्री सहकारी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन
; सर्व पक्षिय नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर
रोहा प्रतिनिधी-(कल्पेश पवार )
                   रोह्यात सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या रोहा शाखेचे उद्घाटन शनिवारी दिमाखात पार पडले. याप्रसंगी सर्व पक्षिय नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र आलेली, माजी आमदार लोकनेते स्वर्गीय अशोक साबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात वलय तयार केले आहे. लोकनेते स्वर्गीय अशोकदादा साबळे यांनी या सहकार चळवळीतून अनेकांना रोजगार दिला. रोहा शहरात सुरू होणारी शाखा म्हणजे तालुक्यातील सहकाराच्या लौकिकात भर पडेल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
सह्याद्री पतसंस्थेच्या ७ व्या शाखेचे उद्घाटन रोह्यात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी अध्यक्षस्थानी होते. पतसंस्थेचे चेअरमन ॲड राजीव साबळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख समीर शेडगे, कमल नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे, विनोद पाशीलकर, विजयराव मोरे,ॲड हेमंत गांगल, लालताप्रसाद कुशवाह, शहर प्रमुख दिपक तेंडुलकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने रोहा व माणगाव तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले.व्हाईस चेअरमन चंद्रशेखर देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *