आयोध्येतील सोहळ्याचे मारूती महाराज कोलाटकर यांना विशेष निमंत्रण

आयोध्येतील सोहळ्याचे मारूती महाराज कोलाटकर यांना विशेष निमंत्रण
सर्व स्तरातून होत आहे स्वागत
खांब,दि.२१(नंदकुमार मरवडे)
                     संपुर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील भगवान श्री राम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्यदिव्य समारंभास उपस्थित राहण्याचे विशेष निमंत्रण रोहा तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र असणारे ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर यांना मिळाले आहे.
         अयोध्येत पार पडणाऱ्या भगवान श्री राम मंदिराचे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय भव्यदिव्य स्वरूपात करण्यात येणार असून या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपुर्ण जग भयातून दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाचे कोकण प्रदेशाध्यक्ष व रायगड भूषण ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर यांना निमंत्रित करण्यात आले असल्याने कोलाटकर महाराज देखील या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.अयोध्येत बांधण्यात आलेल्या भगवान श्री रामाच्या मंदिराचे बांधकाम पुर्ण झाले असून येत्या २२ जाने.रोजी मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास शंकराचार्य, वीरशैव धर्मपिठाचे जगद्गुरु महास्वामीजी,शिवाचार्य,आचार्य, महामंडळेश्वर, राष्ट्रसंत उपस्थित राहणार आहेत.तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ७५०० दिग्गज मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून यामध्ये ५० हून अधिक विदेशी नागरिक उपस्थित राहणार आहेत.दरम्यान या ऐतिहासिक सोहळ्याचे रायगड भूषण ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर यांना निमंत्रित देण्यात आल्याने वारकरी संप्रदायासह सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.तसेच त्यांचे अभिनंदनही व्यक्त होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *