![](https://mhnewstoday.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231217-WA0070-1024x768.jpg)
धामणसई गावामध्ये उभे राहिलेल्या हनुमान मंदिराचे ग्रामस्थांनी पावित्र्य राखा— आमदार अनिकेत तटकरे
मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा भक्तीभावाने साजरा
खांब दि.१७(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील धामणसई येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार उभे राहिलेले हनुमान मंदिर सामाजिक सभागृह हे भव्य दिव्य स्वरूपात उभे राहिले असून ग्रामस्थ व तरुण वर्गांनी या मंदिराचे पावित्र्य राखा असे वक्तव्य आमदार अनिकेत तटकरे यांनी मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्याप्रसंगी केले.
धामणसई येथे हनुमान मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आमदार अनिकेत तटकरे यांनी कार्यक्रमा ठिकाणी भेट दिली
यावेळी आमदार अनिकेत तटकरे पुढे म्हणाले की, धामणसई पंचक्रोशीला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. या भागाला वै.गुरुवर्य अलिबागकर बाबा, गोपाल बाबा वाजे, धोंडू महाराज कोल्हटकर, गुरुवर्य भाऊ महाराज निकम,यांचे कृपाशिर्वाद लाभले आहेत .त्यामुळे यापुढे येथील युवकांनी वारकरी परंपरा पुढे नेले पाहिजे. जुन्या पिढीने हा वारकरी संप्रदायाचा वारसा जपला आहे. पूर्वीचे कौलारू मंदिरावर कळस चढला आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे असे आ.अनिकेत तटकरे यांनी ग्रामस्थांना आवर्जून
सांगितले.आ.अनिकेत तटकरे यांनी रू.१७ लाखांचा आमदार निधी उपलब्ध मिळून दिल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी ह.भ.प. किरण महाराज कुंभार व राहुल महाराज पार्टे भोर-पुणे
यांचे सुश्राव्य किर्तन झाले.तर ज्या देणगीदात्यांनी मंदिराला सढ़लहस्ते मदत केली त्यांचा सत्कार ग्रामस्थांतर्फे करण्यात आला.