रोह्याच्या वनश्री शेडगे ने मिळवली मॅंचेस्टर विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी

रोह्याच्या वनश्री शेडगे ने मिळवली मॅंचेस्टर विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी
कोलाड दि १४ डिसें. कल्पेश पवार ;- रोहा येथील वनश्री समीर शेडगे हिने इंग्लंडच्या मॅंचेस्टर विद्यापीठातून ‘कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. बुधवारी लंडनमध्ये दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी वनश्रीने नेसलेली पैठणी आणि गळ्यातील तिरंगा भारतीय असल्याची अभिमानाने साक्ष देत होता.
वनश्री हिने आपले प्राथमिक शिक्षण रोह्याच्या जे एम राठी इंग्लिश स्कूलमध्ये तर अभियांत्रिकी पदवी नवी मुंबईतील दत्ता मेघे अभियांत्रिकी विद्यालयात घेतली. लंडनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना लंडनच्या म्युझियममध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याची धक्कादायक बाब रोह्याची मराठमोळी रणरागिणी वनश्री शेडगे हिच्या लक्षात आली होती, तेव्हा तिने तातडीने कडाडून आक्षेप घेतला आणि लेखी तक्रार करताच म्युझियमच्या आयोजकांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. लंडनच्या म्युझियम आयोजकांना खडसावून जाब विचारणाऱ्या वनश्रीने अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे व आई डॉ. अवनी शेडगे यांच्या कुटुंबातील वनश्रीने हे यश मिळविल्याबद्दल तीचे सर्व स्तरातून कौतुक होत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *