कोलाड पोलिसांची संकल्पना गणेशोत्सव देखाव्यातुन सायबर गुन्हयांबाबत जनजागृती !

मंगलमूर्ती मित्र मंडळाच्या गणेशोत्सव देखाव्यातुन
सायबर गुन्हयांबाबत जनजागृती !
कोलाड -कल्पेश पवार
                 कोलाड पोलीस स्टेशन यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत मंगलमूर्ती मित्र मंडळ खांब च्या गणेशोत्सव देखाव्यातुन सायबर गुन्हयांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
                 सायबर क्राइम दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीत प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्यांसाठी या सायबर गुन्ह्यांविषयी माहिती व ज्ञान आवश्यकअसल्याने याबाबत जागरूकता देखील खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा होत असताना सायबर क्राइम बाबत ग्रामीण भागात जनजागृती होणे आवश्यकता असल्याने कोलाड विभागातील सार्वजनिक
गणेशोत्सव देखाव्यातुन सायबर गुन्हयांबाबत जनजागृती ही संकल्पना कोलाड पोलीस स्टेशन यांनी गणेशोत्सव मंडळाकडे मांडली होती.पोलीस अधिकारी अजित साबळे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत मंगलमूर्ती मित्र मंडळ खांब च्या गणेशोत्सव देखाव्यातुन सायबर गुन्हयांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.या मंडळाने गणेशोत्सव मंडपात सायबर गुन्ह्यातीळ ईमेल स्पॅम,फिशिंग,पायरेसी,डेटा चोरी, हॅकिंग इ.तसेच कर्ज मिळून देतो असे सांगून फसवणूक, लोण ऍप फसवणूक,सेक्सटॉरशन,महिलांचे फोटॊ वापरून अकाउंट बनून फसवून,ATM पिन बदलून देतो असे सांगून फसवणूक केली जाते,हे सर्व सायबर गुन्हे असून ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक होउ नये म्हणून मंगलमूर्ती मित्र मंडळाच्या गणेशोत्सव देखा व्यातुन सायबर गुन्हयांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.या साठी मंडळातील सर्व पदाधिकारी,सदस्य
यानी मेहनत घेतली आहे.
पोलीस अधिकारी अजित साबळे,गुप्त वार्ता विभागाचे सहकारी नरेश पाटील यांनी खांब येथे जाऊन मंगलमूर्ती मित्र मंडळाची भेट घेहून त्याना सायबर गुन्हे होउ नये म्हणून या गुन्हयांबाबत माहिती दिली.यावेळी बहुसंख्य मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *